अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सेलूत श्री रामबाग मित्र मंडळाचा गणेशोत्सवात – १२ ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलु : शहरातील श्री बालाजी मंदिर ट्रस्ट संचालित श्री रामबाग मित्र मंडळ, मारवाडी गल्ली आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा विशेष आकर्षण लाभणार आहे. मंडळाने यंदा भक्तांसाठी “१२ ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा” साकारला असून, हा देखावा शहरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.दरवर्षी रामबाग मित्र मंडळ काही ना काही नवीन घेऊन येतो. याआधी रामबाग ने केदारनाथ मंदिर देखावा, 31 फुटी शिवलिंग, गणपती व कार्तिकेय यांची विश्व परिक्रमा असे वेगवेगळे देखावे सादर केले आहे व सेलूतील नागरिकांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळते.रामबाग मित्र मंडळाने आपल्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरात नेहमीच विशेष ओळख निर्माण केली असून, यंदाचा १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा भक्तां साठी अप्रतिम आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.तरीही मंडळाच्या वतीने सर्व सेलूकरांना असे आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी हा देखावा पाहण्या साठी गर्दी करावी असे मंडळा च्या संयोजकांनी सांगितले आहे.
