तूमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय गगणभेदी जय घोषाने सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना
मानवत / वार्ताहर.
——————————
मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीच्या (मुंबई) दिशेने ट्रक टेम्पो छोटा हत्ती दिशेने सकल मराठा समाजाचे गरजवंत मराठे आज मुंबईच्या दिशेने रवाना मा. मराठा योध्दा गरजवंत मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आवाहनाला मोठा प्रमाणात आज गरजवंत मराठ्यांनी प्रतिसाद दिला. मोठे आवाहन अडथळे पार करीत मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच केला तर राजकीय नेतृत्वाला साखर झोपेतून जागे करण्याचे काम आता जनताच करणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहे.
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटीहून तीन महिन्या पूर्वी ठरविलेल्या तारखेला ठाम निर्धाराने मोर्चाचे दिशा ठरवून ते अमलात आणण्याचे काम मराठ्यांचे दैवत माननीय मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी केले त्याला सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून फार मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आज निदर्शनात आले. तालुका वाईज सरासरी प्रत्येक गावातून दहा वाहने अशा प्रकारचा फार मोठा प्रतिसाद आढळून आले चित्र दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पासून बिना अडथळ्याचे एखांदी मोहीम फत्ते करणे ते मराठे कसले अशा प्रमाणे आता पर्यंत अडथळ्याचा डोंगर निर्माण करण्याचे काम राजकीय नेतृत्व करीत आलेले आहे.
तर काल गेवराई येथे दोन समाजामध्ये चिड निर्माण करण्याचे काम सुद्धा करण्यात आले परंतु तेथील सुज्ञान नागरिक व कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने ते हाणून पाडले व नोटीस देऊन जालना बॉर्डरला सोडण्यात आले, मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी माननीय उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. तरी सुद्धा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले अटीची सरकार जोपर्यंत दखल घेत नाही व त्याचे कायद्यात रूपांतर झाल्या नसल्याने कारणाने मुंबई येथे होणाऱ्या आझाद मैदानावरील आंदोलना वर मराठे ठाम आहेत हे दिसून आले. मराठा समाजाच्या आरक्षणा विषयी महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाच्या मनामध्ये ना करत्याची भावना ह्या एकच गोष्टीची सकल मराठा समाजामध्ये चीड निर्माण झाल्यामुळे हे आंदोलन शेवटचे असेल म्हणून ग्रामीण व शहरी भागातून हे आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसले विशेष म्हणजे हे आंदोलनाला सर्व सामाजिक स्तरातून फार मोठा पाठिंबा मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे फक्त वैयक्तिक स्वार्थी लालसे पोटी राजकीय मंडळी कडून काही गोष्टीला विरोध करण्यात येत आहे अशी सामान्य जनतेच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आंदोलन कर्त्याच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनकर्ते व सरकार यांच्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
