अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
धाराशिव जिल्हा हादरला,जन्मदात्या आईला संपविले, लेकाला आणि सुनेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!
संगीता इंनकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच जिल्ह्यात एका मुलाने आपल्या पत्नीसोबत आईला मारहाण करीत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहारा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून किरकोळ वादांतून आपल्या मुलाने पत्नीसोबत आईला मारहाण करीत स्वतः तिने गळफास घेतल्याचा बहाणा केला आहे. किरकोळ वादांचे रूपांतर हाणामारीत होते, किंवा भांडणामध्ये होते. परंतु लोहारा येथे एक अघटीतच घटना घडली किरकोळ कारणांतून जन्मदात्या मुलानेच आपल्या पत्नीसमवेत आईला मारहाण करून फासावर लटकवल्याची भयंकर घटना लोहारा येथे घडली आहे. जन्मदात्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली उमाबाई सुरेश रणशुरे (वय 55 ) असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे. कानेगांव रोडवरील इंदिरानगर येथे राहणारे सौदागर सुरेश रणशुरे, पूजा सौदागर रणशुरे (दोघे रा. लोहारा जि.धाराशिव) यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारांस मृत उमाबाई सुरेश रणशुरे यांना घरगुती भांडणाच्या कारणांतून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले आहे. आणि तिला साडी ने गळफास देवुन मृत झाल्याचा बनाव केला होता. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाणेचे स.पो.नि. ज्ञानेश्वर कोकणाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा मृत महिलेच्या मृतदेह सापडून आला त्यांच्या मृतदेहावरील जखमा पाहता त्यांना मारहाण झाल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करून घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि. ज्ञानेश्वर कोकणाळे करीत आहेत. या घटनेने परिसरांत एकच खळबळ उडाली होती.
