करमाळा नगरीत सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य महोत्सव भव्यदिव्य उत्साहात
दिग्गज कलावंतांचा सुरताल पुरस्काराने गौरव
करमाळा प्रतिनिधी : मनोज उराडे
श्री कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित **सुरताल संगीत विद्यालय, करमाळा** यांच्या वतीने पं. कै. के. एन. बोळंगे गुरुजी व पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त **आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत-नृत्य महोत्सवाचे आयोजन** करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात मोठ्या जल्लोषात पार पडले.
या महोत्सवासाठी देशभरातील तसेच परदेशातील दिग्गज कलाकारांची भव्य उपस्थिती होती. कार्यक्रमात सुरताल विद्यालयाने आयोजित केलेल्या **आषाढी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय भक्तीगीत गायन स्पर्धेतील विजेते** तसेच **संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांचा गौरव** करण्यात आला.
गौरविण्यात आलेले पुरस्कार विजेते
*पं. सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ – सरोद)*सुरताल संगीत शिरोमणी पुरस्कार
*डॉ. दुमिथा गुणवर्धन (श्रीलंका – कथक): *सुरताल नृत्यभूषण पुरस्कार*
*श्रीमती बंदना बरूआ (गुवाहाटी – सत्रीय नृत्य) *सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार
*तननी चौधरी (कोलकाता – कथक)** : *सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार*
*डॉ. महेंद्र नगरे (करमाळा – प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ *सुरताल करमाळा भूषण पुरस्कार*
पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने *प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पैठणी देऊन विशेष गौरव करण्यात आला. कलाकारांनी मनोहारी सादरीकरणे करून रसिकांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवर –
या भव्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, पिंक रिव्होल्यूशन महाराष्ट्र राज्य संस्थापिका श्रद्धा जवजांळ, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करेपाटील, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक भाई खाटेर, प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता कांबळे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, नगरसेविका सौ. संगिताताई खाटेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरतभाऊ आवताडे, नगरसेवक महादेव आण्णा फंड, नगरसेवक अतुल भैया फंड, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अजिंक्य पाटील**, तसेच विविध पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ वाघमारे, टीव्ही 9 चे शितलकुमार मोटे** आदींसह संपूर्ण पत्रकार बांधवांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
विशेष उपस्थिती –
या कार्यक्रमासाठी **बीड, लातूर, बारामती, सोलापूर, पुणे** आदी ठिकाणांहून मान्यवर उपस्थित राहिले. यामध्ये प्रकाश शिंदे, अजित कणसे, डॉ. महेश वीर, डॉ. महेश अभंग, विजय खंडागळे, खांडेकर सर, कुलकर्णी सर, गंगणे सर, प्रा. फाटक सर, शिवराज चिवटे\*\* यांचा समावेश होता. महिला वर्गाची उपस्थितीदेखील लक्षणीय होती.
मान्यवरांचे मनोगत –
विद्या विकास मंडळाचे सचिव **विलासराव घुमरे** यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, *”बाळासाहेब नरारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पोहोचवले आहे, हा सर्व करमाळकरांसाठी अभिमानाचा विषय आहे.”*
नवभारतच्या संचालिका **सौ. सुनिता देवी** यांनीही महोत्सवाबाबत गौरवोद्गार काढत सांगितले की, *”संगीत कला ही मानवाला एकत्र आणणारे प्रभावी साधन आहे, आणि सुरताल विद्यालय आयोजित आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य महोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो.”*
कार्यक्रम यशस्वी करणारे –
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी **अशोक बरडे, संतोष पोतदार, दिगंबर पवार, निलेश कुलकर्णी कदम सर, सुहास कांबळे, सतीश वीर, नवनाथ थोरात, आबा साने, उमेश मगर** यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व आभार
कार्यक्रमाचे शुभेच्छाप्रास्ताविक **सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर** यांनी केले.
*सौ. रेश्मा जाधव, सौ. संध्या थोरे आणि अर्चना सोनी* यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.
आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी केले.
