नागपुरात नेत्रदानबद्दल रोशनी फाउंडेशन च्यावतीने जनजागृती निर्माण करणे या विषयावर नेत्र तज्ञांची विशेष चर्चा
प्रतिनिधी सतीश कडू
रौशनी फाउंडेशन च्यावतीने 40 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर च्या निमित्याने 25 ऑगस्ट रोजी, रौशनी फाऊंडेशन नागपूर, इन्स्टिट्यूशन ऑफ इजिनियर्स नागपूर आणि निवृत्त अभियंता मित्र मंडल नागपूर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इजिनियर्स नागपूरच्या सभागृहात नागपुरात नेत्रदानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे ह्या विषयावर, नेत्र तज्ञांचे विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. या निमित्याने नागपुरातील नेत्र पेढीचे नेत्ररोग तज्ञ एका मंचावर आलेत. या चर्चा सत्रात, शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर वे नेत्र विभाग प्रमुख (HOD) डॉ. नंदकिशोर राउत, माधव नेत्रालयचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्री, भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (AIIMS) च्या नेत्र विभाग प्रमुख (HOD) डॉ. पूजा बंग, लता मंगेशकर कॉलेजच्या नेत्र विभाग प्रमुख (HOD) डॉ. रेखा खंडेलवाल, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर (MEYO) चे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल डगवार, महात्मे आय बँकेचे डॉ. निखिलेश वैरागडे, सूरज आय इन्स्टिट्यूटचे डॉ. प्रभात नांगिया आणि, रौशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैन, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे संदीप शिरखेडकर, महेश शुक्ला आणि नाम संस्थेचे विलास अलकरी चर्चासत्रात सहभागी झाले होते. डॉ. पद्मश्री डॉ. विकास महात्मे ह्यांचा विशेष संदेश या प्रसंगी प्राप्त झाला. दान ही संकल्पना प्रत्येक धर्मात आहे. त्यात एक पाऊल पुढे टाकत नेत्रदानांचे महत्व समजावून सांगितले तर नेत्रदानाची चळवळ तयार होऊ शकते नेत्रदानाशी प्रत्येक परिवाराला जोडता येईल पण नेत्रदानाविषयी विविध गैरसमज निर्माण होऊन नेत्रदानांसारख्या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग मिळत नाही. नेत्रदानाची वाढती गरज आणि होणारे नेत्रदान यातील तफावत दूर करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असासूर सुर नेत्रदान पंधरवाड्या निमित्त आयोजित चर्चासत्रातून पुढे आला. डॉ. अग्निहोत्री ह्यांनी, जनजागृती अभावी अद्यापही समाजाचे डोळे मिटलेलेच असून ही नेत्रदानाची चळवळ राबविण्यासाठी समर्पित कार्यकर्ते तयार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. नंदकिशोर राऊत म्हणाले, प्रत्येक धर्मात दानाला महत्व आहे, त्या दानांमध्ये नेत्रदान कसे जोडता येईल, यासाठी कीर्तन तसेच इतर माध्यमांचाही वापर करण्याची गरज आहे चर्वे दरम्यान डॉ. रेखा खंडेलवाल यांनी, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात नेत्रदानाचा टक्का अधिक असल्याकडे लक्ष वेधले. तसेच नागपूर मधील विविध मेडिकल कॉलेज व आय बँकेचे प्रतिनिधि प्रथमच एका मंचावर उपस्थित असल्याचे पाहून आनंद झाल्याचा आवर्जून उल्लेख केला. डॉ. राहुल डगवार, डॉ. प्रभात नांगिया, डॉ. निखिलेश वैरागडे, संदीप शिरखेडकर, महेश शुक्ला आणि नाम संस्थेचे विलास अलकरी यांनीही आपले विचार मांडले आणि नेत्रदान चळवळीला अधिक गती देण्याचे अधोरेखित केले. नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्थांचे जाळे तयार करण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थां यांच्या समन्वयातून नेत्रदानाची जनजागृती करण्याची मोहीम आखण्यात आली, तर या संस्था नेत्रदानाच्या चळवळीतील दुवा बनू शकतात असे रौशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैन म्हणाले. प्रास्ताविक राजेंद्र जैन यांनी केले. संचालन माधव नेत्रालयाच्या श्रीमती नेहा मिश्रा यांनी केले तर सुनंदा लक्षणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास अलकरी, सुरेश गंधेवार, गजानन पाटील, यादव लक्षणे, सुरेश अगळे, सुभाष नाफडे, अनिल इंदाने, श्रीमती निशा मानकर, मालती वनकर, अलका पाटील, रजनी जैन, विद्या अगळे आणि इतर सदस्यांनी सहकार्य केले.
