अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बार्शी तालुका पोलिसांची दमदार कामगिरी ! रसायनिक खतासोबत गांजाची वाहतूक कोट्यावधींचा गांजा हस्तगत: वाहनांसह,आरोपींस अटक !
संगीता इंनकर सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 692 किलो गांजा हस्तगत केला आहे. संशयित आरोपी हा ट्रक मधून रासायनिक खताची वाहतूक होत असल्याचा बहाणा करीत गांजाच्या गोण्या भरून नेत होता. बार्शी तालुका पोलिसांनी या कारवाईत एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किंमतीचा गांजा व 25 लाख रुपये किमतीचे तीन वाहने जप्त केली आहेत. तसंच पोलिसांनी एकाला पाठलाग करून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी बार्शी ते भूम मार्गावरील भोयरे शिवारांत करण्यात आली आहे. या कारवाईत अंकुश दशरथ बांगर (रा.भोयरे ता. बार्शी जि. सोलापूर ) या संशयित आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे एपीआय दिलीप ढेरे यांच्या शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या कारवाईत पोलिसांनी 692 किलो वजनाचा एक कोटी 38 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला तर 25 लाखांची तीन वाहने असा एकूण एक कोटी 63 लाखांचा मुद्देमाल आला हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये अंमली पदार्थ विरोधांतील राज्यांतील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू असुन. संबंधित आरोपींवर आवश्यक ती बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. गांजा तस्करीच्या नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा गांजा कुठे विक्री करणार होता. याचा तपास सूरू असून पोलिसांनी कोट्यावधी रुपये किंमतीचा गांजा आणि तीन वाहने हस्तगत केली आहेत. अधिक तपास स.पो.नि. दिलीप ढेरे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, अभय उंदरे मंगेश बोधले, युवराज गायकवाड,सिद्धेश्वर लोंढे, सागर शेंडगे,उत्तेश्वर जाधव अविरत बरबडे,राहुल बोंदरे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. बार्शी तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करीत अभिनंदन करण्यात आले आहे.
