अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विश्रामबाग पोलिसांची कौशल्य पूर्ण कामगिरी पीएमटी बस ड्रायव्हरचे वाचविले प्राण
फरासखाना वाहतुक विभाग, पुणे शहर
वाहतुक विभागाच्या पोलीस अंमलदारांनी कर्तव्य बजावित असताना पीएमटी बस ड्रायव्हरचे वाचविले प्राण
पुणे:दि.२५/०८/२०२५ रोजी बेलबाग चौकामध्ये पोलीस अंमलदार रोमेश ढावरे व महिला पोलीस अंमलदार अर्चना निमगिरे हे वाहतुक नियमन करीत असताना सायंकाळी 07:15वा च्या सुमा. लक्ष्मी रोड मार्गावरील पीएमपीएमएल बस क्र.एम एच १२ क्यु जी २०६७ पुणे स्टेशन ते कुबेर पार्क (कोथरुड डेपो) ही बस सिटी पोस्ट ऑफिस समोर आली असता सदर बस वरील चालक यास अचानक हृदय विकाराचा झटका आल्यामुळे बसमधील लोक भयभीत होवुन मदतीसाठी आवाज देत होते.
सदरवेळी बेलबाग चौकात वाहतुक नियमन करणारे वरील नमुद पोलीस अंमलदार यांनी लगेच बसमध्ये जावुन परिस्थिती पाहुन बस चालकाला लोकांच्या मदतीने फुटपाथवर आणुन झोपवले. तेव्हा बस चालक हे बेशुध्द अवस्थेत असल्याचे पाहुन पोलीस अंमलदार रोमेश ढावरे यांनी हाताने सीपीआर देवुन सदर बस चालकाला शुद्धीवर आणले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी फरासखाना वाहतुक विभागाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरी. संदिप मधाळे व पोलीस उप-निरीक्षक संजय गायकवाड यांना कल्पना देवुन त्यांच्या मार्गदर्शानाखाली बस चालकास रिक्षा ड्रायव्हरच्या मदतीने स्वतः रिक्षामध्ये बसुन पुना हॉस्पीटल येथे उपचाराकामी तात्काळ दाखल केले. त्यामुळे सदर बस चालकाचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे.
सदरची कामगिरी ही फरासखाना वाहतुक विभागाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरी. संदिप मधाळे व पोलीस उप-निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रोमेश ढावरे व महिला पोलीस अंमलदार अर्चना निमगिरे यांनी केली आहे.
