एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनुकृती सुरुवात

पुणे आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

दुरुस्तीच्या नावाखाली चारचाकी वाहने विक्री करून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद – ५२ लाख किंमतीची ७ वाहने जप्त.

ऑगस्ट २६, २०२५

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव 

पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी कामगिरी करत दुरुस्तीला आलेली वाहने परस्पर विक्री करून फसवणूक करणारा आरोपी भुषण उत्तम काळे (रा. कात्रज, पुणे) यास जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल ५२ लाख रुपये किंमतीची ७ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

दिनांक ०६/०८/२०२५ रोजी फिर्यादी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीची दुरुस्ती व पेंटिंगसाठी आरोपी भुषण काळे यास दिली असता त्याने परस्पर ती गाडी एजंटांच्या माध्यमातून ८ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. १८३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१६, ३१८, ३४०, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीस २१ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. तपासादरम्यान आरोपीकडून इनोव्हा क्रिस्टा, वॅगनर, आय १०, टोयोटा इंटॉस लिवा, वॅगनर, मर्सिडीज व स्विफ्ट डिझायर अशी ७ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत ५२ लाख रुपये इतकी आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय बनसोडे, उप-आयुक्त मिलींद मोहिते व सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र चिप्पा, पोलीस हवालदार आकाश फासगे, राहूल लवटे व अंमलदार सुभाष मोरे यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link