अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गणेशोत्सव पूर्वी आंबेगाव पोलीसांची मोठी कारवाई; तीन सराईत गुन्हेगार तडीपार
ऑगस्ट २६, २०२
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :
गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंबेगाव पोलीस स्टेशनकडून विशेष कारवाई करण्यात आली. स्टेशनच्या रेकॉर्डवरील तिन्ही सराईत गुन्हेगारांना म.पो.का. कलम ५६ अन्वये दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेले आरोपी –
१) अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २०, रा. आंबेगाव खुर्द)
२) विनोद दिलीप धरतीमगर (वय २२, रा. आंबेगाव बु.)
३) प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (वय २१, रा. आंबेगाव बु.)
या तिन्ही आरोपींवर भारती विद्यापीठ व आंबेगाव पोलीस स्टेशन येथे शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही आरोपी पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याने परिसरात त्यांनी दहशत निर्माण केली होती. दमदाटी, लुटमार, मारामारी, तोडफोड, दगडफेक असे प्रकार सातत्याने सुरू असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
आरोपी क्रमांक १ व २ यांना तडीपार आदेश क्रमांक ०४/२०२५ व ०९/२०२५ प्रमाणे दि. १९ ऑगस्टपासून दोन वर्षाकरिता पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. त्यांना अनुक्रमे सातारा व म्हसवड येथे सोडण्यात आले. तर आरोपी क्रमांक ३ यास आदेश क्रमांक १२/२०२५ नुसार दि. २५ ऑगस्टपासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून त्यास २६ ऑगस्ट रोजी शिरवळ (जि. सातारा) येथे सोडण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मा. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मा. मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मा. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, सपोफी चंद्रकांत माने, पो.हवा. निलेश ढमढेरे, पो.अं. अजय सावंत व पो.अं. सोनाली शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
