अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गटसाधन केंद्रात विज्ञान मेळावा संपन्न
गूणवंताचा सत्कार करून गूणगौरव
मानवत / प्रतिनिधी.
——————————————
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 भाषण स्पर्धा हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी आ. मनोज चव्हाण साहेब तसेच केंद्रप्रमुख आ. पवार सर, आ. मुळे सर, आ. गायकवाड सर, आ. मोहकरे सर, आ. उमाकांत हाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. आजचा विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आवाहने या विषयावर भाषण स्पर्धा केंद्रप्रमुख आ. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली व गटसाधन केंद्रातील सर्व विषय तज्ञ, विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांच्या मदतीने यशस्वी करण्यात आली.
आजच्या या स्पर्धेचे परीक्षक मा.होगे सर मा. कवचट सर मा.श्रीमती बोबडे मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने परीक्षण करून गुणांकन केले आहे.
भाषण स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे. गायत्री दिगंबर कास्तोडे. पी. एम. श्री. जि. प. प्रा. शाळा, इरळद- प्रथम क्रमांक नम्रता राजेभाऊ होगे.जि. प. प्रा. शा. नागरजवळा -द्वितीय क्रमांक आर्या विजेंद्र भोसले – जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोड- तृतीय क्रमांक. मान्यवराच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले
