एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद निमित्त नियोजन भवन चंद्रपूर येथे ही बैठक शांततेत संपन्न झाली

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद निमित्त नियोजन भवन चंद्रपूर येथे ही बैठक शांततेत संपन्न झाली.

संपादक संतोष लांडे 

 

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद निमित्त नियोजन भवन चंद्रपूर येथे चंद्रपूर उपविभागाची दिनांक 26 ऑगस्ट रोजी 11 वाजता गणेश मंडळाचे पदाधिकारी मस्जिदचे पदाधिकारी तसेच ईद-ए-मिलाद आयोजक समिती व शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती.

 

या बैठकीत चंद्रपूर चे अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, महावितरण चे मुख्य अभियंता विकास शहाडे , चंद्रपूर महावितरण चे उप विभागीय अभियंता, सुधीर केंद्रेकर, हे मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

या बैठकीला होम डीवायएसपी महेश कोंडावार, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, पडोलीचे ठाणेदार योगेश हिवसे, चंद्रपुर शहर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी अमोल शेळके, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रवी हजारे, सह अन्य पोलिस अधिकारी व चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाळू खोब्रागडे, सुबस्तीयन जॉन, गुलाब पाटील, ताजुद्दीन शेख, भारती दुदानी, मोरेश्वर खैरे, दर्शन बुरडकर, सौरभ ठोंबरे, विशेष शाखेचे राजू अरवेल्लीवार, सुजित बंडीवार, सुभाष शिडाम,दीपक जुमने, राजू चिताडे सह पोलिस पाटील व मस्जिद कमिटीचे बाबू खान, शफी सर,सह शकील रिज़वी, गाज़ी भाई, मरकजी सीरत कमिटीचे मोहम्मद सादिक, सोहेल रजा, सह अनेक मान्यवर उपस्थित होते।
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाळू खोब्रागडे, सुबस्तियन जॉन, दर्शन बुरडकर सह अनेक मान्यवरांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी आगामी सण उत्सव उत्साहाने व शांततेने पार पाडावे कायदा व अबाधित ठेवावा तसेच जातीय सलोखा कायम राहावा हा उदात्त दृष्टिकोन ठेवून आगामी सण साजरे करावे असे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र शासनाद्वारा आयोजित स्पर्धेत सर्व गणेश मंडळांनी भाग घ्यावा व चंद्रपूर जिल्ह्याला तसेच तालुक्याला पुरस्कार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावा असे देखील याप्रसंगी सांगितले.
चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा या दृष्टिकोनातून आपण सकारात्मक राहून आगामी सण उत्सव साजरे करूया!
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी उपस्थितांनी केलेल्या सूचनेचे पालन करण्यात येईल तसेच गणेशोत्सव दरम्यान सर्व रस्ते सुरळीत करण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.      चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता विकास शहाडे यांनी आगामी सण उत्सवात विद्युत पुरवठा बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले तर या कार्यक्रमाचे संचालन विष्णू नागरगोजे यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link