अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सरस्वती नगरातील तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा
वेशभूषेत साहिल चे प्राधान्य
प्रतिनिधी: सतीश कडू
नागपूर : दक्षिण नागपूर मानेवाडा रिंग रोड येथील सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगर नागपूर च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तान्ह्या पोळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व वस्तीतील नागरीकरण यांच्या सहकार्याने सरस्वती नगराच्या मंदिर परिसरातील तान्हा पोळा अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला.
वेशभूषेत वस्तीतील छोटे छोटे चिमुकले तान्ह्या पोळ्यात सहभागी झाले होते. त्यापैकी सरस्वती नगरातील साहिल राकेश गाडगे याला वेशभूषेत दुसरा क्रमांक पटकावून त्यांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी वस्तीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी करून परिसर आनंदमय फुललेला होता. खरी तर तान्ह्या पोळ्याची सगळ्यात मजा म्हणजे छोटी छोटी मुले वेशभूषेत येतात व पोळ्याचा आनंद घेतात यालाच तर तान्हा पोळा म्हटल्या जाते.









