अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्नेहबंध फौंडेशनतर्फे जिल्हास्तरीय गौरी आरास स्पर्धेचे आयोजन…
प्रतिनिधी -सारंग महाजन
अहिल्यानगर – ‘स्नेहबंध’ फौंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय उत्कृष्ट गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे महिला सशक्तिकरण, पर्यावरण, पाणी बचत, प्लास्टिकमुक्ती हे विषय ठेवण्यात आले आहेत. या विषयाला अनुसरून स्पर्धकांनी आपल्या गौरी-गणपतीच्या समोर केलेल्या देखाव्याचा अर्ध्या मिनिटाचा व्हिडीओ व ३ ते ४ फोटो स्नेहबंध सोशल फाउंडेशनकडे सादर करावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुटुंबातील स्पर्धकांनी संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे ८७९३ १९१९१९ या क्रमांकावर ०३ सप्टेंबर पर्यंत पाठवावेत.
‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन आराशींना मान्यवरांचा उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे. या स्पर्धेसाठी भिंगार येथील ‘भंडारी सप्लायर्स’ चे संचालक रुपेश भंडारी हे प्रायोजक आहेत.
