अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव
प्रतिनिधी -सारंग महाजन
अहिल्यानगर – ‘स्नेहबंध’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते सन्मान झाला.
या प्रसंगी बोलताना कृषी अधिकारी बोराळे म्हणाले, “डॉ. उद्धव शिंदे यांनी केलेले सामाजिक कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या अथक प्रयत्नातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असून अशा व्यक्तींचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
डॉ. शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात विविध उपक्रम राबवून समाजासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे अनेक उपेक्षित व वंचित घटकांना आधार मिळाला असून समाजातील ऐक्य, स्नेह आणि प्रगतीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
सन्मान सोहळ्यानंतर उपस्थितांनी डॉ. शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
