अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ऐंन गणेशोत्सवात रत्नागिरी हादरली, जन्मदात्या मुलानेच आईची हत्या केली, तर स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला, घटनास्थळी रत्नागिरी शहर पोलीस दाखल…!!
संगीता इंनकर रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरीत गणेशोत्सवांच्या धामधुमीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जन्मदात्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे. तर स्वतःलाही हाताची नस कापून संपविण्याचा प्रयत्न केला आहे. या हप्त्यानंतर मुलाने ही स्वतःला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे रत्नागिरी चांगलीच हादरली आहे. आरोपी मुलाने हाताची नस कापत स्वतःलाही संपविण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक कर्जांच्या ओझ्यातून आपल्या आईच्या हत्या केल्याची पोलीस तपासात समोर आलं आहे. मृत आईचे नाव: पूजा शशिकांत तेली असे असून आरोपी मुलाचे नाव अनिकेत तेली आहे. अनिकेत आणि आई पूजा हे रत्नागिरी परिसरांतील शांतीनगर येथील रहिवाशी आहेत. अनिकेत त्यांचे वडील शशिकांत तेली सध्या हयात नसून त्यांनी घेतलेल्या कर्जामुळे तो त्रस्त होता. घरात अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणी व कर्जाच्या परत फेडीबाबत तणावाचे वातावरण होते. आणि याच तणावातून अनिकेत ने आईवर सलग वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शेजाऱ्यांना समजतात त्यांनी तेली यांच्या घरी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात अनिकेत आणि आईला बघून शेजाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रत्नागिरी शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी अनिकेत तेली याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. या घटनेचा सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि रत्नागिरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील करीत आहेत.
