अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अहमदपूर शहरासह तालुक्यात नागरिकांना मागणीप्रमाणे दर्जेदार वाजवी दरामध्ये स्वप्नातील घरे बांधून ..
प्रतिनिधी अमोल गोरे लातूर
अहमदपूर शहरासह तालुक्यात नागरिकांना मागणीप्रमाणे दर्जेदार वाजवी दरामध्ये स्वप्नातील घरे बांधून देणारी अशी बालाजी मनदुमले यांनी आपली ओळख जनमानसात निर्माण केली आहे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने लहान कामापासून सुरुवात करून आज टोलेजंग बहुमजली इमारतीचे बांधकाम नाविन्यपूर्ण पद्धतीने लोकांना परवडतील अशा पद्धतीने मन लावून करण्याची हातोटी बालाजी मनदुुमले यांना चांगली अवगत झाली असून अहमदपूर शहर व तालुक्यात बांधकाम म्हटले की एकच नाव समोर येते ते बालाजी मारुतीराव मनदुंमले यांचेच. बालाजी मनदुंमले हे अहमदपूर येथे अनेक वर्ष पासूनचे रहिवासी आहेत त्यांचा जन्म अहमदपूर येथे झाला असून शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती हुशार असल्यामुळे पुढे शिक्षण घ्यावे नोकरी करावी असे मनापासून वाटत होते पण घरची परिस्थिती खूपच हलाखीची आणि गरिबीची असल्याने शिक्षण नाईलाजाने मध्येच बंद करावे लागले शिक्षण सोडून बांधकाम व्यवसायात त्यांचे मन चांगले गुंतले यांनी सुरुवातीलाच मिस्त्री म्हणून दगड विटाचे काम करायला सुरुवात केली हळूहळू आपली मेहनत कष्ट आणि जिद्द यामुळे आणि मनमयाळू मितभाषी प्रेमाने बोलणे असल्यामुळे आपल्या बांधकाम व्यवसायात त्यांची दिवसेंदिवस प्रगती होऊ लागली. या चांगल्या कार्यामुळे त्यांना 20 ऑगस्ट 2025 रोजी एकमत वर्धापन दिनाच्या दिवशी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी अमोल गोरे लातूर अहमदपूर
