अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रामतीर्थ पोलिसांची अवैध रेतीच्या टिप्परवर कारवाई
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ: रामतीर्थ पोलस
ठाण्याचे सपोनि. विक्रम हराळे यांच्या टिमने २३ रोजी सायंकाळी ५ वाजता बिलोली तालुक्यातील केरूर शिवारात एका लाल रेतीने भरलेल्या हायवा टीप्पर पकडून मोठी कारवाई केली आहे.रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विक्रम हराळे यांना विनापरवाना हायवा टिप्पर क्रमांक एम. एच. २६. सि. एच. ९६१२ हा लाल रेतीने भरून आदमपूर फाट्यावरून देगलूर-नांदेड महामार्गाने शंकरनगरकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आदमपूर परिसरात गस्तवर बिट जमादार रामचंद्र काळे व त्यांचे सहकारी अशोक यरपलवाड यांना सपोनि. विक्रम हराळे यांनी सदर गुप्त माहिती कळवली, त्यावरुन केरूर व अटकळीमध्ये असलेल्या भद्रे भंगार दुकानासमोर सदर हायवा उभा करून वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना विचारणा केली असता, सदर वाहन चालक साईनाथ बाबाराव मोरे, रा. टाकळी, ता. नायगाव यांनी काहीच उत्तर दिले २५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नसल्याने सपोनि. हराळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर भवानगिरकर, बीट जमादार रामचंद्र काळे, पोलीस कर्मचारी अशोक यरपलवाड, अनिल रिंदकवाले यांनी लाल रेतीने भरलेला हायवा टिप्परवर कार्यवाही केली. सदर टिप्पर मधील लाल रेती मोजली असता ७ब्रास रेती आढळून आली. त्या अनुषंगाने हायवा टिप्परची किंमत २५ लाख व ७ ब्रास रेतीची किंमत ३५ हजार असे एकूण २५ लाख ३५ हजाराचे मुद्देमाल जप्त करीत सदर वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदरची कामगीरी केल्याने पोलीस अधिक्षक यांनी रामतीर्थ पोलीस पथकाचे कौतुक करुन अभिनंदन केले,
