अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वृक्षारोपणाच्या कार्याचे मूल्यांकन म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावण्यात आला.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
सामाजिक सलोखा, मराठी अस्मिता आणि विकासाच्या दृष्टीने ठाम पावले टाकणारे एक मुत्सद्दी व्यक्तिमत्व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून प्रेरणामास या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण,व वृक्षसंवर्धन संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली. त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून वृक्षारोपणाच्या कार्याचे मूल्यांकन म्हणून त्यांना क्रमांक देण्यात आले. व तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सहसचिव तथा उपशहर प्रमुख दिवा शहर मारुती पडळकर यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सन्मानित केले.
