अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समिती, जिल्हा गडचिरोली यांची आढावा बैठक व माहिती अधिकार अधिनियम 2005 कार्यशाळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
राज्याध्यक्षांचे ऑनलाइन मार्गदर्शन – सभागृहात टाळ्यांचा कडकडाट
गडचिरोली (दि. 24 ऑगस्ट 2025):-
प्रतिनिधी – गडचिरोली संदीप कराडे
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज,
आज गडचिरोली जिल्ह्यातील माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीच्या सर्व पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत आढावा बैठक व माहिती अधिकार अधिनियम 2005 कार्यशाळा उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात संपन्न झाली. समिती ही समाजात *न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व* प्रस्थापित करण्यासाठी सदैव कार्यरत असून, आता प्रत्येक तालुक्यात सशक्त संघटन उभारण्यासाठी नवे नेतृत्व तयार करणे ही काळाची गरज आहे बैठकीत नवनियुक्त पदाधिकार्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यात श्री. पुंडलिक दादगाये** – तालुका सचिव, कुरखेडा, श्री. संजय कुलमेथे – तालुका उपाध्यक्ष, धानोरा, श्री. देवेन्द्रकुमार रंगू – तालुका अध्यक्ष, सिरोंचा या नव्या नेतृत्वाला समितीच्या कार्याचा नवा वेग व दिशा देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
याचबरोबर समाजहितासाठी आर्थिक व मानसिक आधार देत असामान्य कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरवण्यात आलेल्यांमध्ये श्री. सुरज गुंडमवार – जिल्हा उपाध्यक्ष, गडचिरोली, सौ. अनुपमा रॉय – तालुका महिला अध्यक्षा, चार्मोशी, सौ. गोपिका धुर्वे– तालुका महिला कार्यकारिणी सदस्या, चार्मोशी, श्री. लक्ष्मण देवाण – तालुका उपाध्यक्ष, गोडपिंपरी ईत्यादी. कार्यशाळेत जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 1 ते 31 यांचे सविस्तर, सोप्या व व्यवहार्य उदाहरणांसह स्पष्टीकरण केले. त्यांनी सभासदांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि समितीचे कार्य यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, राज्याध्यक्ष श्री. महेश सरणीकर यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षणातील परस्परसंबंध तसेच पोलिस मित्र समितीची समाजातील भूमिका यावर सखोल विवेचन करून सभागृहाला नवी दिशा दिली.
समितीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका प्रतिनिधी व सभासद या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अप्रव भैसारे , तालुका अध्यक्ष, कुरखेडा यांनी केले. भोजनानंतर कार्यशाळेची सांगता जय्यत उत्साह आणि एकात्मतेच्या वातावरणात झाली.
