अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महिलांवर सातत्याने अत्याचार होत असल्याने अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा अंमलबजावणी बाबत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
महिलांवर सातत्याने अत्याचार होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध निषेध करण्यात येत असून मा.मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत शिवसेना नेते ,मा.खासदार राजन विचारे व ठाणे जिल्हा प्रमुख मा.श्री. केदार दिघे मा श्री नरेश मणेरा ह्यांच्या मार्गदर्शनखाली व युवासेना/युवतीसेना ठाणे जिल्हा यांच्या पुढाकाराने दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी ठाणे रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती .
