अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ शिंदवणे हवेली ग्रामीण मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी :श्री गणेश महाडिक
पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने बारामती येथे गणेश उत्सव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी पुणे जिल्ह्यातील जवळपास १००० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक प्रमाणे असे कायदा सुव्यवस्था व सामाजिक उपक्रम राबविणार्या मंडळांचा श्री संदिपसिंह गिल्ल (पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण) श्री गणेश बिराजदार (अप्पर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण) तहसीलदार बारामती प्रांत अधिकारी व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
या वेळी हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथम क्रमांक शिवछत्रपती तरुण मंडळ (शिंदवणे) यांना मिळाला. तर द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण तरुण मंडळ (ऊरुळी कांचन) तृतीय क्रमांक कोहिनूर मित्रमंडळ (ऊरुळी कांचन)यांना मिळाला
यावेळी शिवछत्रपती तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष श्री तुषार सुभाष महाडिक
ऊपाध्यक्ष श्री अशोक एकनाथ महाडिक
कार्यअध्यक्ष श्री सचिन बापु शिंदे
सहकार्यअध्यक्ष श्री महेश गोरक्ष महाडिक
खजिनदार श्री सचिन जालिंदर महाडिक
सहखजिनदार श्री पांडुरंग संभाजी महाडिक
सचिव श्री महेश भुजंग महाडिक
सहसचिव श्री अंकुश बापु महाडिक
ऊत्सवप्रमुख श्री गणेश भुजंग महाडिक
कु संकेत दिलिप नलवडे
कु अदित्य भरत दिडभाई
कु तेजस आबासो महाडिक ऊपस्थित होते
३१ वर्षांची परंपरा जपत असताना शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेस्टिवलचे आयोजन केले जाते तसेच सर्व सामाजिक उपक्रम राबविले जातात मंडळांचे आधारस्तंभ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे जिल्हा श्री आण्णा महाडिक व आयोजक शिंदवणे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री गणेशदादा महाडिक यांच्या पाठबळावर मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा व समाज सेवा अविरत पणे पुढे चालु ठेवणार असे अध्यक्ष श्री तुषार सुभाष महाडिक यांनी सांगितले…!
