अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राहुल भैय्या दुबाले साहेबांचा सन्मान: सलग तिसऱ्यांदा राज्य समितीवर विश्वासाचा शिक्का
शेवगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल अर्जुनराव दुबाले यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य म्हणून निवड झाल्याची अभिमानास्पद घोषणा नुकतीच झाली. या निवडीमुळे पोलीस बांधवांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मा. दुबाले साहेबांनी गेल्या काही वर्षांत पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर ठोस पावले उचलून भरीव कामगिरी केली आहे. त्यापैकी काही ठळक उपक्रम पुढीलप्रमाणे
पोलीस बांधवांच्या निवास, वैद्यकीय सुविधा व शैक्षणिक सोयीसुविधांबाबत मागण्या शासन दरबारी पोहोचवून त्यांचा पाठपुरावा केला.
कर्मचारी कल्याण निधीतील अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करून अनेकांना मदत मिळवून दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अडचणी व बदली प्रक्रियेत येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी सतत संवाद साधला
तरुण पिढीमध्ये शिस्त, समाजसेवा व कायद्याचा आदर निर्माण व्हावा यासाठी संघटनात्मक उपक्रमांचे जाळे उभे केले.
या ठोस कार्यामुळेच शासनाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत सलग तिसऱ्यांदा समितीवर निवड केली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तर्फे तालुका अध्यक्ष दिपक मोहिते सर, शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार, सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “दुबाले साहेबांच्या नेतृत्वामुळे पोलीस बांधवांच्या अपेक्षांना न्याय मिळेल आणि संघटनेचे कार्य राज्यभर अधिक प्रभावीपणे पुढे जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
