लोकसभा पावसाळी अधिवेशन समारोप असताना ईशान्य मुंबई खासदार मा श्री संजय दिना पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष मा श्री ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रतिनिधी जिल्हा मुकूंद मोरे
आज लोकसभा पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. दरम्यान ईशान्य मुंबई खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्लाजी यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत झालेला संवाद प्रेरणादायी होता.
या अधिवेशनात मतदारसंघातील विविध समस्या, महत्त्वाचे विषय यांचा पाठपुरावा करून संबंधित मंत्रालयांचे लक्ष वेधले. लोकसभेतील सत्रांमध्ये सहभागी होण्याचा आणि नव्या अनुभवांचा लाभ घेण्याची संधी लाभली.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या आवाजाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावरून मतदारसंघातील प्रश्न व अपेक्षा मांडणे, हा माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी आहे.
