अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे बाणेर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या
बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर
अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या इसमांनावर बाणेर पोलिसांनी केली कारवाई
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव : गोपाळ भालेराव
बाणेर :दिनांक २१ऑगस्ट २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन यांनी ब्लुमिगडेल्स सोसायटी सर्व्हे नं. १४०/२/३/४ ज्युपिटर हॉस्पीटलच्या समोर बाणेर पुणे येथे इसम नाव १) रवि विजय वर्मा, वय १९ वर्षे, रा. सध्या-शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पिंपळे सौदागर पुणे मुळ-ग्राम बरथवाल, थाना- भरतकुप, जि. चित्रकुट, राज्य-उत्तरप्रदेश २) कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा, वय २३ वर्षे, रा. सध्या-शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पिंपळे सौदागर पुणे मुळ-ग्राम वरथवाल, थाना भरतकुप, जि. चित्रकुट, राज्य उत्तरप्रदेश, यांनी ०३ किलो ४०० ग्रॅम इतका गांजा हा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांच्या वर बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १९३/२०२५ एन.डी.पी. एस कायदा क. ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. सोमय मुंढे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांच्या सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग, सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, पोलीस उप-निरीक्षक संदेश माने, शैला पाथरे, सपोफौ सपकाळ, पोलीस अंमलदार गायकवाड, आहेर, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे, खुडे, पाथरुट, बर्गे यांनी केली आहे.
