अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वैष्णवी हेमंत साने टीम इंडिया प्रतिनिधी विजय होऊन परत आल्यानंतर ग्राम पंचायत किरमीटी भारकस येथे जल्लोष.
प्रतिनिधी सतीश कडू
कु. वैष्णवी हेमंत साने दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिल्याबद्दल किरमीटी भारकस गट् ग्रामपंचायत एमआयडीसी बुट्टीबोरी येथे जल्लोष करण्यात आला.
किरमीटी भारकस ग्रामपंचायत येथे कु. वैष्णवी हेमंत साने दक्षिण आशियाई ६ देशांमध्ये प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून विजय पदक मिळवून दिल्याबद्दल सन्माननीय आतिश उमरे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेते नागपूर जिल्हा, व गट ग्राम.पं.किरमीटी भारकसचे उपसरपंच अतुल गावंडे तसेच गजाननराव बावणे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश लहुजी शक्ती सेना, सचिव महाराट्र लहुजी शक्ती सेना गरिबाजी खोडके, सौ. दिपालीताई वानखेडे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना, व दयाल बावणे अध्यक्ष साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक समिती बुटीबोरी,अंकुश बावणे विदर्भ सरचिटणीस लहुजी शक्ती सेना च्यावतीने स्वागत व पुष्पगुच्छ देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला.
ग्राम.पं.किरमीटी भारकस छोट्याश्या गावातून आलेली गरीब घरातील वैष्णवीचे अपार मेहनत करून वैष्णवी साने भारताच्या वरिष्ठ महिला संघात स्थान मिळवून भारताचे प्रतिनिधित्व केले. ही स्पर्धा दक्षिण आशियाई ६ देशांमध्ये प्रतिष्ठित स्पर्धा झाली असून यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, अफगाणिस्थान या देशांचा सहभाग होता. वैष्णवी ही या आधी नॅशनल लेवलची खेळाडू असून तिने विदर्भ संघाची कॅप्टन म्हणून नेतृत्व केले आहे. वैष्णवीचे सत्कार व स्वागत करण्या करता ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण गावकरी किरमीटी भारकस बसस्थानक वरती मोठ्या उत्साहात जल्लोष करीत स्वागत करण्यात आला. यामध्ये वडील हेमंत साने व आई पुष्पाताई साने यांनी आपल्या लेकीला मिट्टी मारून आलिंगन देऊन चुंबन व आशीर्वाद दिला. याप्रसंगी सौ. वंदना बावणे, सौ. अर्चनाताई जाधव महिला आघाडी अध्यक्षा लहुजी शक्ती सेना बुट्टीबोरी, श्रीमती कविता ताकतोडे, सौ. अल्काताई वानखेडे, गोपाल वानखेडे, पवन गायकवाड, चेतन उरकुडे, दीपक खडसे, चंद्रशेखर बाराहाते, बाबाराव मडावी, अनिल बावणे, बबलू साने, जितेंद्र गावंडे, शीलवान बोरकर, किरणताई साने, कविताताई आत्राम, अक्षरा साने, ऋषिकेश बावणे आणि संपूर्ण गाव याप्रसंगी उपस्थित होते.
