अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नारायणगांव पोलीस ठाणे नेहमीच प्रयत्नशील… उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विशेष कौतुक
संगीता इंनकर पुणे जिल्हा प्रतिनिधी
नारायणगाव पोलीस ठाणे हे नेहमीच प्रयत्नशील आहे. असे उदगार महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी काढले आहेत. नारायणगांव पोलीस ठाणे यांनी 100 दिवसाचे कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मध्ये पुणे ग्रामीण विभागांतील नारायणगांव पोलीस स्टेशन या गटांतून नारायणगांव पोलीस स्टेशन ने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देवुन गौरविण्यात आली त्याबद्दल नारायणगांव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदारांचे देखील अभिनंदन करण्यात आले, यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार म्हणाले नारायणगांव पोलीस ठाणे नेहमीच प्रयत्नशील असे म्हणत नारायणगांव पोलीस ठाणेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे देखील उपमुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुकांची थाप.
