अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिल्लीमध्ये २४ ऑगस्ट रोजी भारत सन्मान २०२५ ने सन्मानित होणार: डॉ. मोतीलाल चौधरी
प्रतिनिधी सतीश कडू
नागपुर : माई ग्रुप आणि माई फाउंडेशन नागपुर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी यांना दिल्लीत कनॉट प्लेस येथील हॉटेल ले मेरीडियन येथे ग्लोबल एक्सलन्स फोरम द्वारे आयोजित भव्य कार्यक्रमात २४ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या उल्लेखनीय, महत्त्वपूर्ण, व्यावसायिक, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यासाठी भारत सन्मान २०२५ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे!
डॉ. मोतीलाल चौधरी हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील एका लहानशा गाव काचेवानी येथील असून नोकरीच्या निमित्ताने इ. सन 2000 साली नागपूरमध्ये गेले आणि गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी विविध व्यवसाय करीत शेवटी आपल्या रिअल इस्टेट व्यवसायात एक उत्तम नाव कमावले आहे. याचबरोबर त्यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य आणि दायित्व ओळखून अनेक महत्त्वाची सामाजिक कामं सातत्याने केली आहेत. त्यांनी दरवर्षी रक्तदान शिबिर, हेल्थ चेक-अप कॅम्प, नेत्रतपासणी, दंततपासणी शिबिरांचं आयोजन, वृक्षारोपण, अखंड भारत रैली, कोरोना काळात मास्क वितरण, अन्नवाटप, अन्नदान, गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन -अशी अनेक सामाजिक कामं केली आहेत. ते नेहमीच गरजूंकरिता तत्पर असतात. त्यांच्या या समाजपयोगी कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना वेळोवेळी सन्मानित केलं आहे. त्यांनी समाजातील विविध संस्थाची जबाबदारी हाती घेऊन खुप चागल्या रितिने सांभाळली. ते आज अंतर्राष्ट्रीय हिन्दू परिषदचे विदर्भ प्रान्त कार्यध्यक्ष, राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे पूर्व उपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघचे शहर उपाध्यक्ष, माई फाउंडेशन चे अध्यक्ष, मैत्रीय शिक्षण संस्थाचे सचिव, अलायंस फाउंडेशन चे अध्यक्ष, युवा भोयर पवार मंच चे संगठन सचिव, पवार समाज कृति समिति नागपुरचे उपाध्यक्ष, फॉर्चून एम्पायर कंडोमीनियम चे अध्यक्ष अश्या अनेक जवाबदारी खुप चांगल्या पद्धतिने राबवित आले आहेत. त्या आधीही मार्च २०२३ मध्ये अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटी तर्फे मुंबईत मानद डॉक्टरेट, सप्टेंबर २०२३ मध्ये नाशिक येथे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड्स, सप्टेंबर २०२४ मध्ये दिल्ली येथे ग्लोबल एक्सलन्स फोरम तर्फे इंडियन आयकॉन अवॉर्ड्स २०२४, तसेच पवार क्षत्रिय समाज, भोपाळ तर्फे २०१८ मध्ये समाजगौरव आणि अशा अनेक पुरस्कारांनी डॉ. चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भारत सन्मान २०२५ ची बातमी जाहीर होताच त्यांच्या ओळखीच्या व निकटवर्तीय मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून सर्वत्र त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन दिलं जात आहे.
