अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून कोणतेहि निकष न लावता मदत जाहीर करावीः जिल्हाप्रमुख महेश नळगे
प्रतिनिधी.नामदेव मंडपे मंठा जालना
परभणी लोकसभेचे खा. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन**
जालना जिल्ह्यात गेल्या दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे
सतत पडणऱ्या पावसामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला शेतकऱ्यांनवर मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे
शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यान मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे
हाता तोंडाशी आले घास निसर्गाने हुसकावून घेतो काय याचा धसका शेतकरी घेत आहेत
पावसाचे पाणी शेतात साचलेने कापूस सोयाबीन मका तुर यासारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जिल्ह्यातील फळबागांना सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची सुध्दा वाताहत झाली आहे
आणि काही पुराचा फटका सुद्धा बसलेला आहे
शेतात आलेल्या पुरामुळे शेतजमीन खरडून गेली आहे
शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात परभणी लोकसभेचे खा. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हाचे जिल्हा प्रमुख महेश नळगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ( उबाठा ) शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी मदतीचे निवेदन दिले
यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख महेश नळगे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम अशोक आघाव तालुकाप्रमुख प्रदिप बोराडे प्रल्हाद नाईकनवरे बाळासाहेब गावडे गणेशराव दराडे भारत पंडित संजय नागरे विठ्ठल वटाणे मधुकर पाईकराव दत्ता सुरंग आबा कदम दिपक काळे संदिप पाचारे किसान सेनेचे राजु शिंदे देविदास राठोड प्रभाकर बामणे रजनीश कणके गणपतराव खोसे बाळासाहेब वैद्य परमेश्वर खरै इब्राहिम कायमखानी अकबर शेख विजय बोरूडे विकास सदावर्ते शिवसेनेचे सर्व आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते
