अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी बुद्रुक फाट्यावर दुचाकी व ट्रक यांच्या अपघातात कबीर मठातील महंत ठार, व दुचाकी चालक गंभीर जखमी
प्रतिनिधी स्वप्नील पाटील जळगाव
एरंडोल:-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपरी फाट्यावर दुचाकी व ट्रक यांचा अपघात होऊन दुचाकी वर बसलेले कबीर मठातील महंत(पिंपरी बुद्रुक) प्रियरंजनदास (वय ३५ वर्ष) हे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक प्रवीण नारायण पाटील वय २३वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले.
महंत प्रियरंजनदास आचार्य हे एका चार चाकी वाहनाने जळगावहून पिंपरी फाट्यावर उतरले. त्यांना पिंपरी बुद्रुक येथे नेण्यासाठी प्रवीण नारायण पाटील हा युवक दुचाकी घेऊन आला होता. महंत दु चाकी वर बसले तोच ट्रकने दुचाकी ला धडक दिल्यामुळे महंत हे जागीच गतप्राण झाले.
मृत महंत हे जवळपास चार वर्षापासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते. विशेष हे की महंत प्रियरंजनदास हे बंगलोर येथे कबीर पंथी धार्मिक कार्यक्रमासाठी पंधरा दिवस हजेरी लावून पिंपरी बुद्रुक येथे परत येण्यासाठी वाहनाने हायवे फाट्यावर उतरले. चार चाकी वाहनातून उतरून दू चाकी वर बसले असता क्रूर काळाने त्यांच्यावर घाला घातला. आणि ते जागीच ठार झाले. त्यांच्या या अपघाती निधनामुळे कबीर पंथी नागरिकांमध्ये शोक कळा पसरली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, त्यांचे सहकारी अनिल पाटील, गणेश पाटील, कपिल पाटील, संजय पाटील अमोल भोसले विलास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
