अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अभिनेता व मॉडेल निखिल शरद मून समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी – सारंग महाजन
दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अमरावती येथे संपन्न झाला. बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाज क्रांती पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूर चिमूर तालुक्यातील खडसांगी येथील अभिनेता व मॉडेल निखिल मून यांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निखिल मून प्रसिद्ध कलाकार मॉडेल आहे. ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र विनर आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक फिल्म स्टार, रील स्टार , निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे
