अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती..!!
संगीता इनकर मॅडम भंडारा जिल्हा प्रतिनिधी.
भंडारा जिल्हा पोलिस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणारे आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. विनोद गुलाब गिरी हे भंडारा जिल्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सामान्य बदली/पदोन्नती आदेशानुसार 21 ऑगस्ट 2025 रोजीचे आदेश हे सर्वसाधारण बदली आणि पदोन्नतीचे आहेत. आणि याच आदेशामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसाठी आणि बदल्यांसाठी आदेश निघाले आहेत. यामध्ये स.पो.नि. विनोद गिरी आता पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीने वर्धा जिल्हा पोलीस दलात लवकरच रुजू होणार आहेत. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल समस्त पुरीगोसावी परिवार आणि अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे रोखठोक महाराष्ट्र ग्रुप तसेच आम्ही सातारकर आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.
