अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मराठा आरक्षणासाठी संदीप गव्हाणे पाटील यांची मुंबई सायकल वारी
मी चाललो तुम्हीही या मुंबईला 29 ऑगस्ट 2025
परभणी प्रतिनिधी गोपाळ भालेराव
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून तसेच गाव पातळी व जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठी मनोज दादांनी वेळोवेळी शांततापूर्ण मार्गाचा अवलंब केला आहे मनोजदादांचा आदेश शिवभक्त तथा मराठा सेवक संदीप गव्हाणे पाटील परभणी येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून येत्या 29 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनात परभणी येथून सायकल वरून निघत आहेत दिनांक 23 ऑगस्ट रोजी संदीप गव्हाणे हे परभणी येथून सायकलवर मुंबईच्या दिशेने निघत आहेत. त्यांचा मार्ग पुढील प्रमाणे आहे परभणी येथून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते मानवत, पाथरी, आष्टी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली सराटी, मनोज दादांची भेट घेऊन शहागड, (खुट्टा चौक) साष्टी पिंपळगाव, आपेगाव मार्गे पैठण कमान, घोटण मार्गे, शेवगाव, पांढरी पुल, अहिल्यानगर ,निफ्टी चौक, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, (मुक्काम) चाकण, तळेगाव, लोणावळा ,वाशी ,चेंबूर, आझाद मैदान मुंबई असा असेल.या सायकल मार्गातून ते मराठा आरक्षणासंदर्भात 29ऑगस्ट होत असलेल्या आंदोलनात संदर्भात जनजागृती करत ते मुंबईला 27 ऑगस्टला पोहोचत आहेत त्यांचे मुक्काम पाच ठिकाणी राहतील.संदीप गव्हाणे पाटील संघर्ष योद्धा मनोज दादांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात गाव गाव सायकलवर फिरून जनजागृती करत आहेत. मागच्या वेळीही ते मुंबईला सायकलवरच गेले होते. त्यांना समाजातून मोठ्या स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. गावा गावातला मराठा येथे 29 ऑगस्ट2025 मुंबईतील आझाद मैदानावर संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आरक्षण लढ्यात सहभागी होणार आहे त्यातच आपला एक छोटा वाटा असावा म्हणून संदीप गव्हाणे पाटील हे आरक्षणाची सायकल वारी करत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
