अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारांचे तात्काळ निलंबन मंग लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
महसूल मंत्री यांना धरले धारेवर..!!
संगीता इनकर जालना जिल्हा प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापुर येथे बदली झालेल्या तहसीलदारांचे तात्काळ निलंबन करण्यात आलं तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील आपल्या निरोप समारंभदरम्यान तहसीलदारांनी आपल्या खुर्चीत बसून याराना चित्रपटातील गाणं गायलं होतं. विशेष म्हणजे यावेळी समोर त्यांच्याच विभागातील इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. पण जालन्यात सिंघम स्टाईलने लाथ मारणाऱ्या डीवायएसपीवर कारवाई कधी होणार? असा सवाल यानिमिंत्ताने उपस्थित होत आहे. (डीवाय एसपी ) अनंत कुलकर्णी यांनी वर्दीत असताना एका आंदोलक शेतकऱ्याला चक्क सिनेस्टाईलने लाथ मारली होती. पायात बूट आणि अंगात वर्दी असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची ही वागणूक नेटीझसनसह विरोधकांनाही चांगलीच खटकली होती. त्यामुळे या महोदयांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याच अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी माहिती घेवुन कारवाई करतो, असे उत्तर महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. मात्र केवळ गाणं म्हणणाऱ्या तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर तातडीने कारवाई झाली. पण लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सरकार काय पाठीशी घालतंय का? असा सवालही या निमिंत्ताने उपस्थित होत आहे.
