अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माणगाव आणि निजामपूर विभागांतील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची सुचना
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
दि.18, 19 ऑगस्ट अतिवृष्टी मुळे माणगाव निजामपूर मधील जनता झाले बेहाल, ट्रॅफिक पोलिस, महसूल प्रशासनाचा पत्ताच नाय! मुंबई गोवा महामार्गावर कळमजे पूल कमकुवत झाल्या मुळे अख्खी मुंबई गोवा महामार्गा वरील वाहतूक शिवाय दिघी पुणे रोड वरील वाहतूक निजामपूर मार्गे वळविल्या मुळे जागोजागी ट्रॅफिक जॅम होत आहे…माणगाव ST स्टँड, मुंबई गोवा जंक्शन वर सर्व नवखे ट्रॅफिक पोलिस दिसत आहेत…वाहनचालकांना आधे इधर, आधें उधर असा इशारा करून मार्गी लावत आहेत…मोठमोठ्या ट्रेलर, कंटेनर, प्रायव्हेट वाहनांसाठी सदर रस्ता नवीन असल्यामुळे एक्सिडेंट होण्याची शक्यता आहे.. रस्त्याची आणि पुलांची क्षमता आणि परिस्थिती नसताना कुठलीही पूर्वसूचना, ठिकठिकाणी योग्य तो पोलिस बंदोबस्त, आपत्कालीन सेवा क्रेन, रुग्णवाहिका न पुरवता ही ट्रॅफिक वळविल्यामुळे जनतेला आणि वाहनचालकांना खूप त्रास होत आहे… लोकप्रतिनिधी, महसूल, ट्रॅफिक पोलिस प्रशासनाचा एकही मोठा अधिकारी ह्या दोन दिवसांत लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर दिसून आला नाही .. मोठमोठाले हेल्पलाईनचे नंबर देऊन आपआपल्या परिवारामध्ये मग्न झाल्याची शंका घ्यायला वाव आहे….काय शासन, प्रशासनाच्या ह्या थर्डक्लास सेवेसाठीच आपण 18% GST, इन्कम टॅक्स, वेहिकल आणि टोल टॅक्स, वेगवेगळे दंड भरायचे का ? जनतेनी याची नोंद घेऊन आपली सुरक्षा आपणच करावी…आपला ट्रॅफिक जॅम आपणच सोडवावा… जागते रहो, इन्के भरोसे मत रहो !
