अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माणूसकी जपणारा माणसातील देव माणूस
काल परवीन तांबोळी ताईंच्या माध्यमातून मा रशिद भाई ( मा अध्यक्ष स्थायी समिती पुणे मनपा ) व मा रफिक भाई शेख ( मा नगरसेवक पुणे मनपा ) यांना भेटण्याचा योग आला…. सकाळी 10 :30 वाजता मा रशिद भाई शेख यांच्या निवासस्थानी परवीन तांबोळी ताई सोबत गेले असताना रशिद भाईंनी मी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले…. कुठली ही पूर्वओळख नसताना फक्त त्यांचे काम फेसबुकच्या माध्यमातून पाहून रशिद भाईंनी रु 25000 रुपयांची डोनेशन स्वरूपात दान दिले…. त्याच बरोबर त्यांच्याशी अर्धा तास सामाजिक कार्या विषयी चर्चा करण्यात आली… या अर्ध्या तासात त्यांना 4 – 5 लोक भेटण्यासाठी आले होते… कुणी शिक्षणासाठी मदत मागत होते तर कुणी उपचारासाठी…. जे ही लोक आले होते त्यांना कुणालाही त्यांनी खाली हात पाठविले नाही सर्वांना आर्थिक स्वरूपात मदत केली… जे ही लोक आले होते त्यांना नाष्टा करून त्यांना पाठविले .आज या वंचित, उपेक्षित गरजू लोकांचा कैवारी यांना भेटण्याची संधी मला मिळाली..आज माणसातील देवाला पाहण्याचे भाग्य लाभले…..त्यांचा मध्यमातून कित्येक वर्षांपासून
शेकडो गरजू कुटुंबाना प्रत्येक महिन्याला महिन्याभराचे रेशन देण्यात येत आहे…. प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून त्यांना मदत करणार हा एक दानशूर व्यक्तिमत्व……. करोनाचा काळात किती तरी कुटुंबांना त्यांनी आधार दिला…..एका आठवड्यापूर्वीच एका ताईचे मोडलेले घर त्यांनी बांधून दिले…अशा दिन दुबळ्यांचा कैवारीला मानाचा मुजरा….
तसेच परवीन तांबोळी ताईंचा सोबत ऑफिस वर गेले असता मा रफिक भाई शेख यांच्या माध्यमातून माझा सनम्मान करण्यात आला तसेच त्यांचा माध्यमातून एका दिव्यांग बांधवाला व्हील चेअर देण्यात आली.,….. काल या दोन्ही महान व्यक्तिमत्वांना परविन तांबोळी ताईंचा मदतीने भेटण्याचा योग आला….. माणूसकी जपणारे आणि समाजाप्रती आपले दायित्व पूर्ण करणाऱ्या दोन्ही दानशूर व्यक्तींना सलाम
आपली सप्तरंगी आई
डॉ आम्रपाली मोहिते
