अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राजवाडी च्या दुधना नदी वरील पुलाला संरक्षण कठडे बसविण्यात यावे.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : राजवाडीच्या दुधना नदीच्या पुलावर संरक्षण कठडे
बसवावेत व नवीन पुल प्रस्तावित करण्यात यावा या मागणी साठीचे निवेदन आज उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सेलू यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की, राजवाडीच्या दुधना नदीवरील पूल खूप जुना व उंचीला खुजा आहे. तसेच पुलाला संरक्षण कठडे पण नाहीत. त्यामुळे काल नदीच्या पुलावर आलेल्या पाण्यात दोघेजण वाहून गेले. संरक्षण कठडे असते तर कदाचित ते वाचले असते. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून तात्काळ या पुलावर संरक्षण कठडे बसविण्यात यावेत व या पुलाची उंची कमी असल्यामुळे तात्काळ नवीन फुल प्रस्तावित करण्यात यावा. नसता दिनांक 28-8-2025 रोजी या पुलावर नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, रामेश्वर वाघमारे, परमेश्वर आवटे, वैभव मोरे, आनंता सूर्यवंशी, गणेश शेवाळे, गौरव बर्वे, आकाश इघवे, रवनीत सिंग आदी उपस्थित होते.
