अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आठ महीन्यांपासुन फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी
पुणे प्रतिनिधी कांता राठोड
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न ४२/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १०९, आर्म अॅक्ट ३ (२५) या गुन्हयामध्ये मागील आठ महीन्यांपासुन फरार असलेला आरोपी करण भारत गजरमल, वय १९ वर्षे, धंदा-काही नाही. रा. फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, श्लोक अर्पाटमेंट, स्वयंभु मंदिराचे अलीकडे, गणेश सुपर शांपीजवळ, दभाडी, आंबेगाव बुग्रा. पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे शोध घेत असताना पाहीजे आरोपी करण भारत गजरमल हा गदा चौकाजवळ थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी गदा चौकात जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १९/०८/२०२५ रोजी १८.२५ या अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सगो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
