अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गेवराई ब्रूक बॉण्ड येथे जि. प.प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:-रमेश सुरशे
(छत्रपती संभाजीनगर)
स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून15 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या गेवराई ब्रूक- बॉण्ड येथील जि.प. प्रा.शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच जि.प.शाळेची गुणवत्ता चांगली असुन, विद्यार्थ्यांना नवोदय व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा मध्ये सहभाग घ्यावा असे सुचवीले.
ग्रामपंचायत कार्यालय गेवराई यांच्या मार्फत हे बक्षिस देण्यात आले,यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी सुरेश रोहकले,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद साठे, शिक्षण प्रेमी ॲड.लक्ष्मीकांत केदार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद थोरात,मुख्याध्यापक साळवे सर, शाळेतील सर्व शिक्षक,पालक,व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
