अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
फारच टोचलंय एकल नाट्य प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलूतील हौशी नाट्य कलावंतांचा उपक्रम.
सेलू : येथील हौशी नाट्य कलावंतांच्या वतीने रविवार ( दि. १७ ) रोजी साई नाट्यगृहात आयोजित प्रसिद्ध रंगकर्मी, सेलूचे भूमीपुत्र धनंजय सरदेशपांडे लिखित, अभिनीत आणि रूपाली गोडंबे दिग्दर्शीत ‘ फारच टोचलंय ‘ या एकल नाट्य सादरीकरणास शहरातील नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकालाच आयुष्यात काही ना काही टोचतच असते. जन्मापासून मृत्यू पर्यंत असंख्य टोचण्या स्वतःला टोचवत आपण जगतच असतो. अशाच रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग पाहून रसिक भारावून गेले. प्रसिद्ध नाट्यकर्मी धनंजय सरदेशपांडे ‘ यांच्या ‘ फारच टोचलंय ‘ या एकल नाट्य सादरीकरणाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘ रंगमंच व्यवस्था शरद कुलकर्णी ( छत्रपती संभाजीनगर ) , पार्श्वसंगीत किरण ढमाले, प्रकाश योजना वैभव पांडव यांची होती. नाट्य प्रयोगास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, नाट्य प्रयोगाचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गोविंदराव जोशी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक महेश खारकर, माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे,प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, रामराव रोडगे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.अनिल कुलकर्णी, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर, रोहिणी कुलकर्णी, करूणा बागले यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन भालचंद्र गांजापुरकर यांनी केले. शशिकांत देशपांडे यांनी आभार मानले. नाट्य प्रयोग यशस्वीते साठी संजय विटेकर, डॉ. शरद ठाकर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ. प्रविण जोग, डॉ. राजाराम झोडगे आणि हौशी कलावंतांनी पुढाकार घेतला. नाट्य प्रयोगास शहरातील विविध क्षेत्रातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
