अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्यदक्ष… अजित टिके यांनी कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला..!!
पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांची सांगलीला बदली
संगीता इनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची सांगली तुरूची सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर सातारा जिल्ह्यात दुसऱ्यांदा नव्याने आलेले पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सोमवारी कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर कोरेगांवच्या मावळत्या पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिल्या… मागील आठ दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पोलीस दलातील चार पोलीस उपअधीक्षक (डीवाय एसपी ) दर्जेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये कराड फलटण दहिवडी कोरेगांव येथील अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर सातारा जिल्हा पोलीस दलाला तीन नव्याने ( डीवायएसपी ) मिळाले असून त्यांनी आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी पदभार स्वीकारला आहे. कोरेगांव चे नूतन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी यापूर्वी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिल्याने त्यांना सातारा जिल्ह्याचा अभ्यास चांगला आहे. यापूर्वी कोल्हापूर,सांगली,नागपूर विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. जिल्ह्यातून बदली झालेले अधिकारी डॉ. अश्विनी शेंडगे यांची पुणे गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे तर डॉ. अमोल ठाकूर ठाणे शहर तर राहुल धस नवी मुंबई येथे आणि सोनाली कदम यांची सांगली तुरुची पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. तर जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस उपअधीक्षक अजित टिके,विशाल खांबे रणजीत सावंत सुनील साळुंखे आणि राजश्री पाटील हे नव्याने अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले असून. त्यांनी आपल्या पदस्थापने ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशावरून पदभार स्वीकारला आहे
