अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
थेपडे विद्यालयात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 16 ऑगष्ट वार शनिवार रोजी म . मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ सत्रात ज्युनिअर कॉलेजच्या व दुपार सत्रात माध्यमिकच्या विद्यार्थ्यांकडून दहीहंडी फोडण्याचे नियोजन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री पी.डी. चौधरी सर यांच्या शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.उप मुख्याध्यापक जी.डी बच्छाव सर हे सदर प्रसंगी उपस्थित होते. मुलींसाठी गरबा व मुलांसाठी तीन थर लावून दहीहंडी फोडण्यात आली .यात सर्व ज्युनिअर कॉलेजचे व माध्यमिकच्या शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला .सुरुवातीला मुलींनी तीन थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पुन्हा 11वी च्या विद्यार्थ्यांनी तीन थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी सकाळ सत्रात इयत्ता बारावीचे विद्यार्थ्यांनी व दुपार सत्रात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. *हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की |* जयघोषाने आसमंत दणाणून गेला.*गोविंदा आला रे आला* गाण्यावर ठेका घेत सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांनी पावसात भिजत कार्यक्रमाचा आनंद लुटला. मुलींना व मुलांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. शेवटी लाह्या व बत्ताशे प्रसाद म्हणून वाटण्यात आले.
