आष्टी हादरले!- प्रियंका कुंदोजवार मृत्यू प्रकरण – पतीस अटक, सात जणांवर गुन्हा; मृत्यूचे गूढ अधिकच गडद
गडचिरोली प्रतिनिधी मनोज उराडे
आष्टी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील प्रियंका कुंदोजवार (२८) हिच्या संशयास्पद मृत्यूने धक्कादायक वळण घेतले आहे. दोन चिमुकल्या लेकरांना पोरके करून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. घटनेमुळे संपूर्ण तालुका स्तब्ध झाला आहे.
पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
प्रियांकाच्या आई सुवर्णा कत्रोजवार (रा. गडचिरोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
पती पराग कुंदोजवार याचे पल्लवी वैरागडवार (रा. नागपूर) हिच्याशी प्रेमसंबंध
सतत शारीरिक व मानसिक छळ, मारहाण व शिवीगाळ
आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी परागसह त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि पल्लवी वैरागडवार अशा एकूण सात जणांवर गुन्हा क्रमांक २१८/२०२५ कलम ८५, १०६, ११५(२), ३५२, ३(५) बि.एन.एस.-२०२३ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
पराग कुंदोजवारला तीन दिवसांची पोलिस कोठडी- मुख्य आरोपी परागला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित सात जणांवर पुढील कारवाई होणार काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धक्कादायक सकाळचा तपशील
रक्षाबंधनासाठी माहेरी गेलेली प्रियंका १३ ऑगस्ट रोजी रात्री आष्टीला परतली
सकाळी मुलांसाठी जेवणाचा डबा करून दिला
पती शोरूम उघडण्यासाठी बाहेर गेला, मोबाईल विसरल्याने परत आला
दरवाजा आतून बंद… जबरदस्ती उघडला असता प्रियंका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली
दोन सानुल्यांना पोरके करून…
सहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी यांच्यासह मोठा संसार मागे ठेवून प्रियांकाने टोकाचा निर्णय घेतला
गावात हळहळ; “प्रियंका का त्रस्त झाली?” हा प्रश्न अनुत्तरित
