अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष व मनसे नेते श्री अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सव सोहळा
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष व मनसे नेते श्री. अविनाश जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली भगवती मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या भव्य आणि परंपरागत दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचा योग आला. हा केवळ एक सण नाही, तर मराठी संस्कृती आणि अस्मितेचा एक विराट सोहळा आहे.
’ही दहीहंडी मराठी सणांसाठी व मराठी मनांसाठी आहे’ या भावनेने भारावलेल्या वातावरणात, शेकडो बालगोविंदा पथकांचा उत्साह आणि त्यांची जिद्द पाहून मनस्वी आनंद झाला. त्यांचे उंचच उंच रचलेले थर हे केवळ मानवी मनोरे नसून ते मराठी तरुणांच्या एकजुटीचे आणि ध्येयनिष्ठेचे प्रतीक आहे.
