अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नेताजी सुभाष विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी.
दहिहंडी उत्साहात माखन चोरांसह सवंगड्याचा मोठा सहभाग
मानवत / प्रतिनिधी
गोकुळ अष्टमी निमित्त नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात मूख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाले शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी गोपालकाला व दहीहंडी फोड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अल्काताई सोळंके , सोरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी विद्यालयातील ममताताई कुमावत, श्रीमती संगीताताई थोरे, सुरेखाताई चंदाले, सोनालीताई माने, मिनाक्षीताई कहात, श्रीहरी कच्छवे सर, बालाजी गोंन्टे सर, एकनाथ मूळे सर, वैभव होगे सर , सूबान शहा सर, साईप्रसाद मूंडलोड, पालक व शालेय कर्मचारी यांच्या सह गोविंदांची उपस्थिती लक्षनिय होती. शाळेतील मुला-मुलींनी “माखनचोर दहीहंडी फोड” या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी थर लावून दहीहंडी फोडली. पावसाच्या रिमझिम सरीत झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरला. कार्यक्रमा निमित्त अल्काताई सोळंके, सोरेकर यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षारोपण, स्वच्छता व भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. तसेच उर्वरित गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि मूख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्यासह शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले.विद्यालयातील एस.एन.कच्छवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शेवटी मूख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी सर्व उपस्थित मान्यवरासह सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह संचारल्याने उत्साहाचे वातावरण होते.
