अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश तारु
दि.१५/८/२०२५ रोजी स.८:०० वाजता,
चैतन्य भाषा प्रसार मंडळाचे कार्यकारी मंडळ,ज्ञानवर्धिनी संस्थेच्या नूतन बालविकास मंदिर, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळा,सदाशिव पेठ ,पुणे येथे पोहोचले. ह्या शाळा मराठी माध्यमाच्या असून अनेक वर्षे मुलांना ज्ञानदानाचे काम करत आहेत.संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बडबड गीत,हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत ज्या मुलांनी भाग घेतला होता व त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना चैतन्य भाषा प्रसार मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज प्रशस्तिपत्रके देण्यात आली, खाऊ देण्यात आला, तसेच शाळेने हा जो स्तुत्य उपक्रम राबवला त्यासाठी त्यांना दोन सन्मानचिन्हे व गौरवपत्रे प्रदान करण्यात आले. चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापिका सौ. अनिता जोशी,सौ.रेवती रायरीकर,सौ.अवंती बायस,सौ.मुग्धा पत्की,कुमुदिनी बिल्ला तसेच संस्थेच्या विश्वस्त सौ.मेहेर निरगुंदीकर/ काळे हजर होत्या, तसेच संस्थेचे संचालक, शिक्षक,पालक ,व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.सौ.रेवती रायरीकर यांनी चैतन्य भाषा प्रसार मंडळाचे काम कसे चालते,आपली मायबोली मराठी भाषा किती समृद्ध आहे व दिसामाजी काहीतरी लिहित जावे परी अखंड वाचीत जावे, वाचनाने आपली एकाग्रता,सभाधीटपणा वाढतो असे सांगितले.त्यानंतर मुलांनी कवायत करून दाखवली,देशभक्तीपर गीतांच्या तालावर लेझीम खेळले.खाऊ वाटप झाला.शिक्षक आणि चैतन्य भाषा प्रसार मंडळ यांच्यातील काहीनी स्वरचित कवितांचे वाचन केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
