अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मराठवाड्यातील नांदेड परभणी व हिंगोली जिल्ह्याची तहान भागवणारे येलदरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्या मुळे पुर्णा नदिकिणार्यावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली.श्रीहरी अंभोरे पाटील
जिल्ह्यातील हिंगोली व परभणी सीमेवर असलेल्या येलदरी धरण हे पूर्णा नदीवर असून या धरणातील पाणीसाठा सर्व ९५ %टक्के एवढा झाला असून त्यामुळे येलदरी धरणाचे गेट क्र 1 व गेट क्र 14 हे दोन गेट उघडण्यात येतील व पूर्णा नदित पात्रत कोनत्या ही क्षनी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पुर्णा पाटबंधारे उपविभाग वसमत यांनी एका लेखीज् निवेदनाद्वारे कळवले आहे त्यामुळे नदीकिनारी असणाऱ्या नागरीकांनी नदि पात्रात उतरूनये किंवा नदित आपले पाळीव प्राणी जनावरे गाई बैल यांना चारण्यासाठी घेऊन जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे
2025 चा रब्बी व उन्हाळी हंगामात नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील पुर्णा पाटबंधारे लाभ क्षेत्रातील पाणी प्रश्न मिटला मिटला यामुळे पुर्णा पाटबंधारे लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
