अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना भवन येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, माजी महापौर महादेव देवळे, उपनेत्या शितल शेठ-देवरुखकर, आमदार विभागप्रमुख महेश सावंत, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, माजी महापौर विभागसंघटक श्रध्दा जाधव तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
