अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गुरुदत्त विद्यालय चौसाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
चौसाळा प्रतिनिधी विवेक कूचेकर
आदरणीय लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब अध्यक्ष गुरु महाराज शिक्षण प्रसारक मंडळ चौसाळा . यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून नावारूपाला आलेल्या. *गुरुदत्त* *माध्यमिक व उच्च माध्यमिक* *विद्यालय, चौसाळा* येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कोषाध्यक्ष ऍड.रामेश्वरजी काशीद व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर ऍड .काशीद यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. सामूहिक राष्ट्रगीताच्या गजराने संपूर्ण परिसर सर्व दुमदुमून सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन यथोचित गौरव केला.
कार्यक्रमास संस्थेचे सदस्य सौ. पुष्पाताई काशीद, शालेय समिती अध्यक्ष श्री. उमेशरावजी आंधळे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सयाजी बप्पा शिंदे, सदस्य संभाजी अबा जोगदंड. सदस्य रत्नाकर रावजी जोगदंड गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षकवृंदामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री. केदार सर, विज्ञान विभाग प्रमुख मोठे सर, इंग्रजी विषयाचे अभ्यासक श्री. पवार सर, गणित विषयाचे तज्ञ शिक्षक श्री. गुरव सर, हिंदी विभाग प्रमुख श्री घोडके सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती साबणे मॅडम, इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक श्री. होंडे सर, शाळेतील वरिष्ठ लिपिक श्री. जाधव सर, सहशालेय उपक्रम प्रमुख श्री. वैद्य सर, तसेच सहकारी श्रीमती टाचतोडे बाई, श्री लिमकर सर श्री. धनंजय वाघमारे, श्री. संजय सोनवणे, श्री. विश्वनाथ पवार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांचा सक्रिय सहभाग होता.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रभावी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवेचे धडे दिले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. श्रीमंत चौधरी सर यांनी स्वातंत्र्याचा रोमांचकारी इतिहास विद्यार्थ्यांसमोर आपल्या परखड शैलीत विशद करताना देशभक्ती व देश प्रेमाची ज्योत विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये पेटवली . वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना कोषाध्यक्षॲड .काशीद साहेबांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आलेश्री घोडके सर यांनीउपस्थित मान्यवर, पालक, नागरिक व विद्यार्थी यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोठे सर यांनी आपल्या ढंगकार शैलीनेकेले कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान म्हणून केली.
—
