अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बदल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू च्या वतीने सत्कार.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंच्या वतीने दि. 14 ऑगस्ट रोजी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बदल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू च्या वतीने नूतन इनडोअर क्रीडा हॉल मध्ये सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांतनाईक रामेश्वर गाडेकर, रघुनाथ टाके, विजय खरात, पोलीस कर्मचारी हरी खूपसे, रनमाळ , आदी मान्यवरांनी सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बोलताना दिपक वाघमारे म्हणाले खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, मेहनत खिलाडूवृत्ती वतीने मैदानावर पदक प्राप्त करून उच्च पदावर नौकरी करून आपल्या आई वडीलांचा व गुरूजींना सन्मान वाढवावा.देशभरातील प्रशंसनीय पोलीस सेवेसाठी दरवर्षी दिले जाणारे राष्ट्रपती पदक यंदा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले असून महाराष्ट्रातील एकूण ३८ पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. या मानाच्या यादीत सेलू उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांचा समावेश झाला आहे.महाराष्ट्र पोलीस सेवेतील त्यांच्या कर्तृत्व, निष्ठा आणि उत्कृष्ट कार्यामुळे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना शिस्तबद्ध कारभार, गुन्हेगारी नियंत्रण, जनतेशी सुसंवाद आणि उत्कृष्ट तपास कार्य यासाठी वाघमारे यांची कामगिरी विशेष ठरली आहे.
दरम्यान, पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी गुरुवार १४ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.पोलीस उप निरीक्षक पदी निवड 1995 सहायक पोलीस निरीक्षक पदी निवड, 2008 पोलीस निरीक्षक 2011पोलीस उपअधीक्षक पदोन्नती झाली आहे.पोलीस महासंचालक पदक 2024 रोजी मिळाले आहे.पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती. 2025 पर्यंत सेवेत असताना उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे 300 च्या वर बक्षिसे मिळाले आहेत. व 45 प्रशस्ती पत्रे मिळाली असून उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन – 2024 साली पोलीस महा संचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाचे सन्मानचिन्ह सुद्धा प्राप्त झालेले आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने त्यांना राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आलेले आहे.
