अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
चारित्र्यांच्या संशयावरून लोणीकंद मध्ये नवविवाहितेने घेतला गळफास, पती सासू वर लोणीकंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल..!!
अनुजा कारखेले ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी
चरित्र च्या संशयावरून पतीकडून झालेल्या छळामुळे नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना डोंगरगावात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासूला देखील अटक केली आहे. राणी मुंजाजी गाडगे (वय 18) डोंगरगांव ता. हवेली जि.पुणे) असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भागवत अंकुश कदम (वय 24) आणि सासू मुक्तता अंकुश कदम (वय 54) दोघे रा. डोंगरगांव हवेली जि.पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भागवत आणि राणी या दोघांचा 24 मे 2025 रोजी विवाह झाला होता. पतीकडून आणि सासू कडूंन सतत चारित्र्यांच्या संशयावरून आणि मानसिक त्रासांतून झालेल्या छळामुळे नवविवाहित महिला राणी घाडगे हिने ( दि. 8 ऑग ) रोजी अखेर गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.*
